¡Sorpréndeme!

Dont create drama with metro;पुणे मेट्रोची पाहणी करण्याचा ड्रामा फडणवीसांनी करु नये

2021-08-07 3,461 Dailymotion

पुण्याचा विकास हा देवेंद्र फडणवीस यांच्या सवडीनुसार नाही तर अजित पवारांच्या गतीने होणार

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचा फडणवीसांना टोला


पुणे मेट्रोची(Pune Metro) पाहणी करून हे काम आपणच केले असल्याचा ड्रामा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) करू नये असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी फडणवीसांना लगावला आहे, पुणे मेट्रोची चाचणी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झालेली असताना आज पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोची पाहणी केली याच मुद्द्यावर  यांनी देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी टीका केली, पुण्याचा(Pune) विकास हा देवेंद्र फडणवीस यांच्या सवडीनुसार नाही तर अजित पवारांच्या गतीने होणार आहे अशी टिपण्णी ही चाकणकर यांनी।केली,
पुणे महापालिकेच्या निवडणुका काही  महिन्यांवर आल्या आहेत त्यामुळे मेट्रोचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जात आहे

बाईट- रुपाली चाकणकर
#rupalichakankar #devendrafadnavis #ajitpawar #punemtero #punemetro #punecity #pune